सोशल मीडियावर स्टेटस ठेवून युवकाची सासरी आत्महत्या

Youth from Vivere commits suicide after posting status on social media रावेर (2 ऑक्टोबर 2025) : सोशल मिडीयावर स्टेटस टाकत रावेर तालुक्यातील विवरे बुद्रुक येथील तरुणाने आत्महत्या केली. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.आहे. अफजल रमा तडवी (21, विवरे बु.॥, ता.रावेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

काय घडले तरुणासोबत
अफजल या तरुणाने भोकरी येथे सासरी असताना सोशल मीडियावर स्टेटस ठेवून अजंदे रस्त्यावरील केळीच्या बागेतील रामफळाच्या फांदीवर गळफास घेतला. अफजल हा पत्नी सानिया सोबत सासरी 29 रोजी गेला होता.

1 सप्टेंबर रोजी त्याने त्याच्या मोबाईलवर ‘आज मी आत्महत्या करीत आहे व त्यास मी स्वतःच जबाबदार राहील.’ असा संदेश देत आत्महत्या केल्याची घटना दुपारी 4.25 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.