Tapti Public School, Bhusawal, ranks first in the National Anthem, Know India Quiz Competition भुसावळ (25 सप्टेंबर 2025) : भारत विकास परिषद शाखा भुसावळतर्फे राष्ट्रीय समूहगान स्पर्धा तसेच भारत को जानो प्रश्नमंजुषा स्पर्धा प्रभाकर हॉलमध्ये आयोजीत केल्या होत्या. यात राष्ट्रीय समुहगान स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कूलचा प्रथम क्रमांक आला.

यांची होती उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, समुपदेशक आरती चौधरी, डॉ.नीलिमा नेहेते, योगेश मांडे, सतीश खडायते व हरीश कोल्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी दीपिका हिंगवे यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पालकांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय समुहगान स्पर्धा, भारत को जानो प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. यावेळी शहरातील आठ शाळांनी समुहगान स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात
तापी स्कूल प्रथम
राष्ट्रीय समूहगान स्पर्धात प्रथम क्रमांक ताप्ती पब्लिक स्कूल, द्वितीय बियाणी मिलिटरी स्कूल, तृतीय एन. के. नारखेडे विद्यालय यांनी मिळवला तर भारत को जानो प्रश्नमंजुषा घेण्यात आल्यात. यात या स्पर्धेत लहान गटात 11 आणि मोठ्या गटात 13 शाळांचा असा एकूण 24 शाळांचा सहभाग होता. लहान गटात प्रथम के. नारखेडे विद्यालय, द्वितीय बियाणी मिलिटरी स्कूल, तृतीय वर्ल्ड स्कूल, मोठया गटात प्रथम आदर्श हायस्कूल, द्वितीय के.नारखेडे विद्यालय, तृतीय पी.के.कोटेचा हायस्कूल यांचा क्रमांक आला. विजेत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यात विजयी संघांना रोख पारितोषिक,प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार वितरणासाठी रजनी सावकारे,आरती चौधरी,आकाश पाटील,अविनाश मुजुमदार,किशोर शिंपी,चेतन पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक शाखा पालक डॉ.नीलिमा नेहेते यांनी केले. अध्यक्ष सतीश खडायते यांनी स्पर्धांबाबत मनोगत व्यक्त केले. डॉ.राहुल पांडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तर अनघा फडके यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. गिरीश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला योगेश मांडे, डॉ.छाया चौधरी, विलास फालक यांसह मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धांच्या यशस्वितेसाठी राधा चव्हाण, स्मिता बेंडाळे, वंदना खडायते, विधी मेहता, कविता हिरोडकर, जयश्री चौधरी आदींनी परिश्रम घेतले.