BJP cleanliness campaign in Bhusawal भुसावळ (25 सप्टेंबर 2025) : भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तापी नगर येथील सप्तश्रृंगी माता मंदिर व परीसरात राबविण्यात आलेल्या या स्वच्छता अभियानास वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची विशेष उपस्थिती होती. स्वच्छता अभियान झाल्यावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते पुष्पहार टाकून सामुहिक अभिवादन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अजय भोळे, जिल्हा सरचिटणीस डॉ.केतकी पाटील, परीक्षीत बर्हाटे, जिल्हा उपाध्यक्ष खुशाल जोशी, जिल्हा चिटणीस प्रविण इखणकर, उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, माजी प्रभारी नगराध्यक्ष राजेंद्र नाटकर, प्रमोद नेमाडे, नगरसेवक पिंटू कोठारी, सतीश सपकाळे, अजय नागराणी, अॅड.बोधराज चौधरी, नीळकंठ भारंबे, शहर सरचिटणीस पवन बुंदेले, सागर चौधरी, जयंत माहुरकर, चेतन जैन, प्रशांत नरवाडे, बी.ए.पाटील, श्रेयस इंगळे, सुजीत भोळे, योगेंद्र हरणे, अॅड.अभिजित मेणे, गिरीश पाटील, किरण सरोदे, उदय पाटील, राजु खरारे, लक्ष्मी मकासरे, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, माधुरी चौधरी, भारती वैष्णव, वंदना सोनार, माधुरी एकनाथ चौधरी, राहुल तायडे, लखन रणधीर, संजय बोचरे, रवी दाभाडे, अल्बर्ट तायडे, शुभम पाटील, रितेश भारंबे आदी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.