मेघनाथ, कुंभकर्णाच्या पुतळ्याचेही होणार दहन

भुसावळात आज रावण दहन : आतषबाजी ठरणार लक्षवेधी

Ravana burning today by Jai Matrubhoomi Pratishthan in Bhusawal भुसावळ (2 2025)  शहरातील जय मातृभूमी मंडळाने परंपरेनुसार टीव्ही टॉवर मैदानावर रावण दहन उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे असतील. रावण दहन मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते, कुंभकर्ण पुतळ्याचे दहन उद्योजक मनोज बियाणी तर मेघनाथ पुतळ्याचे दहन माजी प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे यांच्याहस्ते होईल. दरम्यान, रावण दहनप्रसंगी होणारी आतषबाजी लक्षवेधी ठरणार आहे.

35 फूट उंच रावणाची प्रतिकृती
मातृभूमी मंडळातर्फे गुरुवार, 2 रोजी दसर्‍याला रावण, मेघनाथ व कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचे दहन होईल. सायंकाळी 5.30 वाजता टीव्ही टॉवर मैदानावर होणार्‍या या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. 35 फूट उंच रावण, 30 फूट उंच मेघनाथ व कुंभकर्णाच्या प्रतिकृती असतील.

यांची असेल कार्यक्रमास उपस्थिती
माजी आमदार दिलीप भोळे, नीळकंठ फाल्क, डीवायएसपी संदीप गावीत, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, उद्योजक विजय चौधरी उपस्थिती देतील, अशी माहिती जय मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी
नगरसेवक किरण कोलते यांनी दिली. दरम्यान, रावण दहनाच्या पार्श्वभूमीवर टीव्ही टॉवर मैदानावर साफसफाई पूर्ण झाली असून परिसरातील सर्व रस्त्यांच्या कडेला तसेच मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.