Bhusawal Municipal Election : Ward composition announced, approving one objection भुसावळ (2 ऑक्टोबर 2025) : भुसावळात पालिका निवडणुकीसाठी तयारीला वेग दिला आहे. निवडणुकीपूर्वी प्रशासनाने अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली असून केवळ एका हरकतीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात प्रभाग क्रमांक 22 मधून प्रगणक गट 29 वगळून तो प्रभाग 29 मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

8 रोजी मतदार यादी जाहीर होणार
आगामी भुसावळ नगरपालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 8 ऑक्टोबर रोजी मतदार यादी जाहीर होणार असून 13 ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवता येतील. 28 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. मतदार केंद्रांची यादी 7 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. राज्य निवडणूक आयोगाने 29 ऑगस्टला दिलेल्या अधिसूचनेनुसार 1 जुलैला अस्तित्वात असलेली विधानसभा क्षेत्राची मतदार यादी वापरण्यात येईल.
केवळ एका हरकतीला मंजुरी
भुसावळ पालिका प्रशासनाने यापूर्वी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यावर 29 हरकती प्राप्त झाल्या. नैसर्गिक सिमांचे उल्लंघन, प्रभागांचे विभाजन, लोकसंख्येत असमानता अशा हरकती जास्त होत्या. यातील केवळ एक हरकत मंजूर करून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यानंतर प्रभागांच्या भौगोलिक स्थितीचे चित्र
स्पष्ट होताच इच्छुकांनी व्यूहरचना सुरू केली आहे.