OBC leader Prof. Laxman Hake पुणे (30 ऑगस्ट 2025) : राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवण्यासाठी जरांगेसह अजित पवारांचे आमदार, खासदार सहभागी झाल्याचा गंभीर आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पत्रपरिषदेत केला.

हाके म्हणाले, झुंडशाहीच्या जोरावर राज्यातील ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा घाट सुरू आहे. हा आरक्षणाचा लढा नाही. जरांगेंनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली. मी सरकार उलथून लावणार आहे, असे म्हणाले. जरांगे न्यायालयाला मानायला तयार नाहीत. लक्ष्मण हाके वर गुन्हा, जरांगेंना रेड कार्पेट का? असा सवालही हाके यांनी केला.
आम्ही गावगाड्यात 50 टक्के आहोत. सगळे एकत्र झाले तर तुमचे काय होईल. तुम्ही ओबीसींचे आरक्षण संपवायला चालला आहात. ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी. ओबीसी मंत्र्यांना ओबीसी समाज माफ करणार नाही. मी आमदार, खासदाराचा पोरगा नाही, मी चुकलो असेल तर मला आतमध्ये टाका. आता जातीजातीत भांडायची वेळ नाही. मी आत्महत्या करू का? म्हणजे प्रश्न सुटतील, असा उद्विग्न सवालही हाके यांनी केला.