सातारा जिल्हा हादरला : आरोपीला पकडताना पोलिसांवर हल्ला ; प्रत्त्युत्तरात आरोपीचे इन्काउंटर

Satara district shaken : Police attacked while arresting accused; Accused encounters in retaliation सातारा (30 ऑगस्ट 2025)  : कुख्यात आरोपीने चैन चोरीचा गुन्हा केल्यानंतर आरोपीनेा सातारा पोलिसांवरच हल्ला चढवल्याने चौघे पोलिस जखमी झाले व त्याचवेळी पोलिसांनी आरोपीचा इन्काउंटर केला. ही धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील शिक्रापूर येथे घडली. लखन भोसले असे एन्काऊंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे.

कुख्यात आरोपीचा पोलिसांवर हल्ला
सूत्रांच्या माहितीनुसार, लखन भोसले हा कुख्यात असून त्याने सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे केले आहेत. दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करीत पळ काढला व त्याचा ठिकाणा गवसल्यानंतर सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेल्यानंतर आरोपीने हल्ला चढवला व याचवेळी पोलिसांनी आरोपीचे इन्काउंटर केले.