भुसावळ (31 ऑगस्ट 2025) : कोलते फॉउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये मराठी कविता गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी परीक्षक वैशाली शिरसाठ, शारदा सेनी, प्रणिता डेडगे या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कविता गायन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध कवितांचे गायन करून आपले कौशल्य सादर केले. त्यांच्या या गुणांचे कौतुक परीक्षकांनी केले.
हा कार्यक्रम मुख्याध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सूत्रसंचालन जयश्री पाटील यांनी केले. सर्व कार्यक्रमास शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.