स्मार्ट मीटर विरोधात भुसावळातील शिवसेना ठाकरे गट आक्रमक

भुसावळ (31 ऑगस्ट 2022) : शहर व तालुक्यातील गावांमध्ये स्मार्ट मीटर लावू नका, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे. स्मार्ट मीटर लावू नये असे निवेदन अति.कार्यकारी अभियंता पाटील यांना शिवसेनेचे उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख व माजी नगरसेवक (उबाठा) दिलीप सुरवाडे यांनी दिले. कार्यकारी अभियंता भामरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली.

स्मार्ट मीटरला तीव्र विरोध
स्मार्ट मीटर हे जास्त गतीने फिरतात त्यामुळे ग्राहकांना दरमहा 1 ते 3 हजार रुपये भूर्दंड बसतो, वेळेवर बिले मिळत नाही, काही ग्राहकांना सहा महिने ते वर्षभर बिले मिळत नाही, अशी तक्रारी मांडण्यात आल्या.त्यावर ते म्हणाले की, पुन्हा ठेका वाढवण्यात येत आहे. कामात गती येईल .

या स्मार्ट मीटरमध्ये जास्त रिडिंग येईल अशी रचना असून संपूर्ण देशात आणि सत्ताधारी पक्षातून विरोध करण्यात येत आहे. गरीब , दुर्बल घटकांना अशी जास्तीची बिले आल्याने मीटर कनेक्शन बंद होण्याचा धोका या योजनेतून होणार आहे त्यामुळे ग्राहकांनी हे मीटर लावून घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप सुरवाडे, ज्येष्ठ पदाधिकारी ललित मुथा, उपशहर प्रमुख शरद जैस्वाल, शरद जोहरे, शहर संघटक योगेश बागूल, गणेश चौधरी, पल्लवी जैन, दीपक जैन आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.