एमपीसह कर्नाटकातील आरोपींकडून दोन लाखांचा गांजा : जळगाव गुन्हे कामगिरी

अटकेतील आरोपींमध्ये मध्यप्रदेश, कर्नाटकच्या दोघांचा समावेश

Ganja worth two lakhs seized from accused from MP and Karnataka : Jalgaon crime scene जळगाव (31 ऑगस्ट 2025) : जळगाव गुन्हे शाखेसह फैजपूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत नऊ किलो 717 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याचे बाजारमूल्य एक लाख 94 हजार 340 रुपये आहे. अटकेतील आरोपी मध्यप्रदेशसह कर्नाटक राज्यातील रहिवासी आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शरद बागुल, हवालदार प्रवीण भालेराव, हवालदार मुरलीधर धनगर, कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, कॉन्स्टेबलगोपाल पाटील, चालक कॉन्स्टेबल महेश सोमवंशी हे गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी शासकीय वाहनाद्वारे फैजपूर उपविभागात गस्त घालत असताना फैजपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत न्हावी गावाजवळील शेतातील एका पत्र्याच्या घरात काही व्यक्ती गांजा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर फैजपूरचे प्रभारी अधिकारी सहा.निरीक्षक रामेश्वर मोताळे, यावल निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या उपस्थितीत आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत आवश्यक सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून छापेमारी करण्यात आली.

दोघा आरोपींना बेड्या
न्हावी गावातून जानोरी गावाकडे जाणार्‍या रस्त्यालगत किशोर भागवत पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या घरातून आरोपी रगन सुकराम बारेला (32, रा.महादेव शिरवेल, ता.भगवानपूरा, जि.खरगोन, मध्यप्रदेश) व अझरुद्दीन अब्दुल वाहिद कुरेशी (27, रा.सिध्दबलपूर, एलहंका, बेगळुरु अर्बन, कर्नाटक) यांना अटक अटक करण्यात आली. फैजपूर पोलिसात सिद्धेश्वर डापकर यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, फैजपूर एपीआय रामेश्वर मोताळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शरद बागुल, निरज बोकील, विनोद गाभणे, हवालदार प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, देवेंद्र पाटील, विकास सोनवणे, सिद्धेश्वर डापकर, गोपाल पाटील, भूषण ठाकरे, महेश सोमवंशी, देविदास सुरदास आदींनी केली.