दोन गावठी पिस्टल, सहा काडतूस बाळगणार्‍या अमळनेरच्या आरोपींना बेड्या

Major action by Amalner police: Suspect with two village pistols, six cartridges अमळनेर (31 ऑगस्ट 2025) : अमळनेर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतूस बाळगणार्‍या दोघांच्या मुसक्या बांधल्या आहेत. ही कारवाई गुरुवार, 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.

गोपनीय माहितीद्वारे कारवाई
अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना शस्त्र तस्करीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. अमळनेर शहरातील चोपडा रस्त्यावर आसाराम बापू आश्रमाच्यासमोर पोलिसांनी सापळा रचल्यानंतर रुवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी विशाल भैय्या सोनवणे (18, रा.ढेकुसीम, ता.अमळनेर) आणि गोपाल भीमा भिल (30, रा.सत्रासेन, ता.चोपडा) यांना अटक करण्यात आली व आरोपींकडील दोन गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी केली. तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.