Laborer dies after falling from second floor of construction site : Nashirabad incident नशिराबाद (31 ऑगस्ट 2025) : नशिराबाद गावात बांधकाम सुरू असताना दुसर्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 30 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सादिक मेहमूद पिंजारी ( 35, रा.नशिराबाद, ता. जळगाव) असे मृताचे नाव आहे.

काय घडले तरुणासोबत ?
मिस्त्रीकाम करणारा सादिक हा आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह राहत होता. नशिराबाद येथे भवानी नगर परिसरात एका ठिकाणी बांधकामाचे काम सुरू असताना तेथे सादिक हा शनिवारी सकाळी काम करताना सकाळी 9 वाजेच्या सुमारास दुसर्या मजल्यावरून खाली पडला.
यावेळी त्याला डोक्याला, अंगाला जबर मार लागला. ग्रामस्थांनी तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्याचा दुपारी 4 वाजता मृत्यू झाला.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे नशिराबाद येथे शोककळा पसरली. तरुणाच्या मृत्यूमुळे रुग्णालयात गर्दी झाली.