Mobile thief from Wardha caught by Railway Protection Force from Geetanjali Express भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी भुसावळ विभागात राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आरपीएफतर्फे मोठी कारवाई करण्यात आली. शेगाव रेल्वे स्टेशनवर संशयित हालचालीत असलेल्या तरुणास अटक करून त्याच्याकडून तब्बल 47 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

27 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता गीतांजली एक्स्प्रेस (नं.12860) च्या जनरल डब्यात संशयास्पद फिरणार्या सुरज विनोद किंगगवाकर (26, रा.स्वावलंबी बी.एड. कॉलेज परिसर, धांतोली, जि.वर्धा) या तरुणास आरपीएफच्या गुन्हे शोध पथक व जीआरपीच्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेण्यात आले. पंचासमक्ष तपासणी केली असता त्याच्या पँटच्या खिशातून विविध कंपन्यांचे एकूण तीन मोबाईल आढळले. लाल रंगाचा सुमारे 16 हजार रुपये, हिरवा रंगाचा सुमारे 25 हजार रुपये आणि ग्रे रंगाचा सुमारे 6 हजार रुपये किंमतीचा असे तीन मोबाईल एकूण 47 हजार रुपयांचे त्याच्याकडून जप्त झाले.
चौकशीत संशयीताने कबुली दिली की, हे मोबाईल त्याने मागील महिन्यात मलकापूर व शेगाव स्थानकावरून चोरी केले होते. यापैकी एक मोबाईल चोरीची तक्रार शेगाव पोलिसांकडे आधीच दाखल आहे, तर रियलमी कंपनीचा मोबाईल त्याने 25 जुलै रोजी मलकापूर स्टेशनवर महाराष्ट्र एक्स्प्रेस (11039) मधून झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून चोरण्यात आला या प्रकरणात पुढील तपासासाठी संशयीताला जीआरपी शेगावच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.