Jalgaon MIDC police take major action: Handcuffs man who created terror at gunpoint जळगाव (1 सप्टेंबर 2025) : पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्याच्या जळगाव एमआयडीसी पोलिसांची मुसक्या आवळल्या आहेत. शुक्रवार, 30 ऑगस्ट रोजी रात्री 9.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. जळगाव तालुक्यातील कुसुंबा शिवारात, विमानतळाजवळ असलेल्या दोस्ती पान सेंटरसमोर आरोपी हातात पिस्तूल घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली.

पोलिसांनी धाव घेत केली कारवाई
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना कुसुंबा शिवारात एका व्यक्तीने गावठी कट्टा बाळगला असल्याची माहिती मिळाली. पोलिस कॉन्स्टेबल राहुल घंटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवार, 30 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9.30 वाजता घटनास्थळी धाव घेतली. छत्रपती संभाजीनगर रोडवरील दोस्ती पान सेंटरसमोरून अमोल सुरेश खैरनार (28, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले व अंग झडतीत एक हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. असतानाही आरोपीने हे शस्त्र बेकायदेशीरपणे बाळगले होते.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल राहुल घंटे यांनी एमआयडीसी पोलिसात आरोपी अमोल खैरनारविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार रामदास कुंभार करत आहेत.