Assistant Agriculture Officer along with Data Entry Operator in Dhule ACB’s net धुळे (1 सप्टेंबर 2025) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान योजनेचे अनुदान जमा केल्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागून सात हजारांवर तडजोड करीत ही लाच स्वीकारताना धुळे तालुक्यातील साक्री येथील सहाय्यक कृषी अधिकारी मन्सीराम कळशीराम चौरे (45, जेबापूर रोड, पिंपळनेर, ता.साक्री) व व कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर रिजवान रफिक शेख (23, पोळा चौक, साक्री, जि.धुळे) यांना धुळे एसीबीने कार्यालयातच सोमवारी रात्री उशिरा अटक केल्याने धुळे जिल्ह्यातील लाचखोर पुरते हादरले आहेत.

धुळे एसीबीकडून सातत्याने लाचखोरांवर धडक कारवाई केली जात असल्याने लाचखोरांनी कारवाईचा धसका घेतला आहे तर सर्वसामान्य जनतेतून या कारवाईचे स्वागत होत आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या नावे पन्हाळीपाडा, ता.साक्री येथे शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान योजनेचे अनुदान जमा झाल्याने त्या मोबदल्यात दहा हजारांची लाच मागण्यात आली. सोमवार, 1 सप्टेंबर रोजी धुळे एसीबीकडे दूरध्वनीद्वारे तक्रार आल्यानंतर पडताळणी करून सापळा रचण्यात आला व कार्यालयात आरोपींनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, कॉन्स्टेबल मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रीतेश चौधरी, रेश्मा परदेशी, हवालदार सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.