Father and son attacked by a coyote over a dispute over asking for an answer in Bhusawal भुसावळ (1 सप्टेंबर 2025) : दुचाकीचा धक्का लागल्यानंतर जाब विचारल्याच्या रागातून तरुणासह त्याच्या पित्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना खडका रोडवरील उस्मानिया हॉटेलसमोर रविवारी मध्यरात्री सव्वा वाजता घडली. याप्रकरणी संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मांडीवर मारला कोयता
ईकबाल जुम्मा पिंजारी (42, खडका रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, शहरातील खडका रोडवरील उस्मानिया हॉटेल समोर 31 रोजी आरोपीच्या गाडीचा धक्का लागल्याने त्यास जाब विचारल्यानंतर संशयीत आगा उर्फ तौसीफ भाई पिंजारी (42, खडका रोड, भुसावळ) याने सोबतच्या कोयत्याने वार केल्याने हाताच्या पंजाला व करंगळीला दुखापत झाली तर मुलगा जुनेदच्या मांडीवर कोयता मारल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतील तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. संशयीत पिंजारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांतीलाल केदारे करीत आहेत. दरम्यान, या हल्ल्यात संशयीतदेखील जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी सांगितले.