Body of a young man from Dahigaon found in a well यावल (2 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील दहिगाव शिवारातील शेतातील विहिरीत 40 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. महमूद हुसेन पटेल (40, रा.दहिगाव) असे मृताचे नाव आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काय घडले तरुणासोबत ?
चुंचाळे रस्त्यावरील खुशाल चौधरी यांच्या शेतातील विहिरीत मृतदेह असल्याची माहिती मिळताच यावल पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे, राजेंद्र पवार, विजय चौधरी आणि पुरुषोत्तम पाटील हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.