Bhusawal Municipal Election : 31 objections to the draft on issues of violation of boundaries, division of wards, inequality in population भुसावळ (2 सप्टेंबर 2025) : पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना 18 ऑगस्टला होऊन हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. मुदतीच्या अखेरच्या दिवशी 31 ऑगस्टपर्यंत 31 हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर मंगळवारी 2 प्रांताधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता सुनावणी झाली. . दरम्यान सर्वाधिक हरकती नैसर्गिक सिमांचे उल्लंघन, प्रभागांचे विभाजन, लोकसंख्येत असमानता आदी विषयांवर अधिक हरकती आहेत.

अखेरच्या दिवशी 26 हरकती
पालिकेच्या प्रारुप प्रभाग रचनेवर 31 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत होती. शुक्रवारपर्यंत केवळ पाच हरकती दाखल झाल्या होत्या. तर अखेरच्या दोन दिवसांत 26 हरकती पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. पालिका प्रशासनाकडे दाखल झालेल्या हरकतींमध्ये प्रामुख्याने नैसर्गिक सिमांचे उल्लंघन, वगळलेला हद्दीचा भाग, असमान लोकसंख्या आदींच्या मुद्द्यांवरच अधिक हरकती आहेत.
नियम पाळले नाहीत
मरिमाता मंदिराचा भाग, भिलवाडी परिसर यापूर्वी अनेक निवडणुकीत प्रभाग सात मध्ये होता. आता हा एकमेव परिसर प्रभाग आठमध्ये टाकण्यात आला आहे. यामध्ये नैसर्गिक सिमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. रस्ते, नाले आदींची कोणत्याही प्रकारचे नियम पालिका प्रशासनाने पाळले नाहीत. असा आरोपही माजी नगरसेवक मुकेश पाटील यांनी केला आहे.
जनसुनावणी घ्यावी : पगारेंची मागणी
माजी नगरसेवक तथा गटनेते उल्हास पगारे यांनी प्रभाग 1, 2 आणि 4 च्या रचनेबाबत आक्षेप नोंदवला आहे. नवीन प्रभाग रचनेच्या सीमा नैसर्गिक सिमांना प्रभावीत करणार्या आहेत. यासोबतच सन 2011, सन 2016 च्या निवडणूकीत प्रभाग एक मध्ये असलेल्या गजानन महाराज मंदिर परिसर, राहूल नगर आदी भाग या प्रभागातून वगळण्यात आला आहे. स्थानिक खरा अभिप्राय गोळा करण्यासाठी जनसुनावणी घ्यावी, असा मुद्दाही उल्हास पगारे यांनी मांडला आहे.
लोकसंख्या असंतुलन झाले
नवीन प्रभाग रचनेत अनेक प्रभागांमध्ये लोकसंख्येचे असंतुलन झाले आहे. प्रभाग चारमधील रेल्वे जागेवरील अतिक्रमण काढल्यामुळे बेघर झालेल्यांचे मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहे. मात्र मुख्य निवडणूक आयोगानेही बेघर झालेल्यांना 0-एझखउ छे. ने मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. यामुळे हे मतदान मतदानापासून वंचीत राहतील, असा मुद्दाही उल्हास पगारे यांनी मांडला आहे.
2022 ची रचना जशीच्या तशीच घेतली
प्रारुप प्रभाग रचना करतांना शहरातील मोठे रस्ते, गल्ली, नाले याचा विचार न करता प्रभाग रचना केली आहे. संदर्भीय पत्रामधे नमुद परिशिष्ट 5 मधील 5.5 अन्वये 5.5.2 च्या मार्गदर्शन तत्वांचा भंग झालेला आहे. प्रारूप प्रभाग रचना करतांना कोणतीही तसदी घेतली नाही. 2022 मधे प्रसिध्द केलेल्या प्रारुप प्रभाग रचना जशिच्या तशी जाहिर केली आहे. केवळ प्रभागांचे नंबर बदल केलेले आहे. हि भुसावळच्या करदातयांची दिशाभूल केलेली असुन नगरपालिका, नगरपरिषदा, औद्यागिक नागरी अधिनियम 1965 मधील 25 जानेवारी 2022 च्या अधिनियमांचा सुध्दा भंग झाल्याचा आक्षेप माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी घेतला आहे.