अल्पवयीनावर अत्याचार : पतीसह प्रियकराविरोधात गुन्हा ; जळगावात काय घडले ?

Abuse of minor: Crime against husband and lover; What happened in Jalgaon? जळगाव (2 सप्टेंबर 2025) : अल्पवयीनाचा विवाह लावल्यानंतर पतीने मारहाण केल्याने पीडीता बहिणीकडे आली व नंतर प्रियकरासोबत गेल्यानंतर त्यांच्यात शारीरीक संबंध झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पती, त्याच्या नातेवाइकांसह मुलीचा प्रियकर व मदत करणार्‍या एकूण 10 जणांविरुद्ध जळगावच्या शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले पीडीतेसोबत
रावेर तालुक्यातील एका गावातील महिला तिच्या 15 वर्षीय मुलीला जून महिन्यात जळगावात पुतणीकडे घेऊन आली. येथे या मुलीचे चांगदेव येथील तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून दिले. त्यानंतर पतीने तिला मारहाण केल्याने ती जळगावात चुलत बहिणीकडे निघून आली. त्यानंतर बहिणीच्या दिराने या अल्पवयीन मुलीला घराबाहेर काढले. तिने प्रियकराशी संपर्क साधून त्याला जळगावात बोलविले. तो या मुलीला कुसुंबा, ता.जळगाव येथे एका महिलेकडे घेऊन गेला. तेथे राहत असताना मुलगी व तिच्या प्रियकरामध्ये शारीरिक संबंध आले.

दहा जणांविरोधात गुन्हा
हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला. त्यामुळे मुलीसह आई निंभोरा पोलिस ठाण्यात पोहोचली. तेथे मुलीने फिर्याद दिली. त्यावरून मुलीची आई, चुलत बहीण, चुलत मेहुणा, त्याचा भाऊ, मुलीचा पती, माम सासरे, माम सासू, प्रियकर, त्याला राहण्यासाठी मदत करणारी महिला, अशा एकूण 10 जणांविरुद्ध 31 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा शनिपेठ पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.