The credit for winning the reservation battle goes to the Marathas who fought with their lives! : Manoj Jarange-Patil छत्रपती संभाजी नगर (3 सप्टेंबर 2025) : माझ्या गरीब मराठ्यांनी जिवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. सरकारने आरक्षणासंबंधी काढलेल्या तिन्ही जीआरचे श्रेय मी समाजाला देतो. हे यश त्यांचेच आहे. ते त्यांनीच मिळवले. मी केवळ नाममात्र असे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहे.

मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावरील आपले बेमुदत उपोषण मंगळवारी सायंकाळी मागे घेतले. त्यानंतर सध्या त्यांच्यावर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या लढ्याचे यशाचे श्रेय त्यांनी मराठा समाजाला दिले. ते म्हणाले, शेवटी काहीही होवो, माझ्या गरीब मराठ्यांनी जिवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. खूप प्रतिक्षा होती. अनेक शतकांपासून. ती लढायला शेवटी मराठ्यांनी यश आपल्या पदरात पाडून घेतले. म्हणून सर्वात अगोदर महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना या आनंदाचे, या काढलेल्या तिन्ही जीआरचे मी समाजाला क्रेडीट देतो. सर्व यश समाजाचे आहे. ते त्यांनीच मिळवले. मी केवळ नाममात्र आहे.
जरांगे म्हणाले, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने माझ्या शब्दावर विश्वास ठेवला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात जाणार म्हणजे जाणार यात तिळमात्र शंका नाही. कुणी ही शंका ठेवायचीही नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत म्हणून गॅझेटियर काढायचे. त्याचा जीआर निघणे खूप आवश्यक होते. 1881 पासून हा जीआर काढण्यात आला नव्हता. एक साधी ओळखही सरकारने मराठ्यांच्या हिताची लिहिली नव्हती. स्वातंत्र्य मिळून 75-76 वर्षे झाली. पण मराठ्यांच्या हक्काचे गॅझेटियर होते. पण त्यानंतरही सरकारने सरकारने एक ओळही मराठ्यांच्या हिताची दिली नव्हती.
फक्त संयम व शांतता बाळगून शांत डोक्याने विचार करा. एखादा विदुषक आणि अविचारी माणसावर विश्वास ठेवून कधीही आपण आपला संयम व विश्वास ढळू द्यायचा नाही. कारण, निर्णय घेताना नेहमीच आम्ही दोन जण निर्णय घेतो. निर्णय घेताना मी एकटा निर्णय घेत नाही. मी व माझी 7 कोटी गोरगरीब जनता हा निर्णय घेते, असे ते म्हणाले.
सरकारच्या अध्यादेशावर टीका करणार्यांवरही यावेळी जरांगेंनी निशाणा साधला. ते म्हणाले, आपल्या हातातून सगळे गेल्यामुळे काहींचे पोट दुखत आहे. त्यांना ज्या आरक्षण व गॅझेटवर राजकारण करायचे होते. ज्याच्यावर त्यांचे संपूर्ण जीवन अवलंबून होते. आता ते पूर्णतः कोलमडून गेले आहे. मग आता करायचे? हे लोक आतापर्यंत केव्हाच आपल्या बाजूने बोलले नाहीत. हे नवे नाही. मराठा समाजाला याचा जुना अनुभव आहे.