जळगावात वाईन शॉपमध्ये तोडफोड ; मॅनेजरसह कामगारांना मारहाण

Wine shop vandalized in Jalgaon; Manager and workers beaten up जळगाव (3 सप्टेंबर 2025) : वाईन शॉपबाहेर वाद घालणार्‍या दोघांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी दुकानात घुसून मॅनेजर आणि कामगारांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार, 30, रोजी रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले जळगाव शहरात ?
राजेंद्र युवराज सोनवणे (33, रा.सागर नगर) हे अजिंठा चौफुली येथील ‘राज वाईन शॉप’मध्ये मॅनेजर आहेत. शनिवार, 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुकानाजवळ दोन व्यक्ती आपापसात वाद घालत होते. राजेंद्र सोनवणे आणि दुकानातील इतर कामगारांनी त्यांना ‘येथे वाद घालू नका’ असे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला.

याचा राग आल्याने त्या दोघांनी दुकानावर हल्ला केला. त्यांनी जबरदस्तीने दुकानात प्रवेश केला आणि दगडाने काचेच्या दरवाजाची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी राजेंद्र सोनवणे आणि इतर कामगारांना शिवीगाळ करत मारहाण केली.

या घटनेनंतर राजेंद्र सोनवणे यांनी एमआयडीसी पोलिसात दिल्यावरून दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.