Dispute over Usanwari money in Jalgaon: Case filed against quartet who beat up youth जळगाव (3 सप्टेंबर 2025) : उसनवारीच्या पैशांवरून वाद झाल्याने चौघांनी मिळून दोन तरुणांना बेदम मारहाण केली. ही घटना रविवार, 31 ऑगस्ट रोजी शहरात घडली. एमआयडीसी पोलिसात चौकडीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले जळगावात ?
रामेश्वर कॉलनीतील गजानन राजाराम रायते (26) याचे काही लोकांसोबत उसनवारीच्या पैशांवरून वाद होते. याच वादातून रविवार, 31 ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊ वाजता शुभम पाटील याने गजाननला काशिनाथ चौकात बोलावले. गजानन त्याचा मित्र शेखर तरटे याच्यासह तिथे पोहोचला. यावेळी शुभमने त्याचे साथीदार सनी जाधव, दिनेश चौधरी, आणि अप्प्या उर्फ आकाश मराठे यांनाही तिथे बोलावले होते.
गजाननचा मित्र शेखर बोलत असताना सनी जाधवने त्याला तोंडावर थप्पड मारून शिवीगाळ केली आणि ‘तू मध्ये बोलू नकोस’ असे बजावले. त्यानंतर त्यांनी दोघांनाही मेहरुण परिसरातील अशोक किराणाजवळ बोलावले.
हे दोन्ही तरुण त्या ठिकाणी गेल्यावर चौघांनी त्यांना लाथा-बुक्क्याांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत शुभम पाटीलने शेखर तरटेला लाकडी दांडक्याने मारून गंभीर जखमी केले. तसेच, शिवीगाळ करत ‘आपली खुन्नस कायम राहील’ अशी धमकीही दिली.
या प्रकरणी गजानन रायतेने दिलेल्या तक्रारीनुसार, शुभम विजय पाटील, सनी जाधव, दिनेश चौधरी आणि अप्प्या उर्फ आकाश मराठे (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. तपास हवालदार किरण चौधरी करीत आहेत.