Dhule Crime Branch action : Abroad accused arrested धुळे (3 सप्टेंबर 2025) : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सहा महिन्यांसाठी हद्दपार केल्यानंतरही संशयीताचा शहरात वावर असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळताच संशयीताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. चेतन जिभाऊ पाटील (30, भोकर, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
संशयीत चेतन पाटील यास गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते मात्र संशयीत धुळ्यातील गोंदूर रोडवरील सौभाग्य लॉन्स परिसरात फिरत असताना गुन्हे शाखेने त्यास अटक करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, अंमलदार संतोष हिरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, दिनेश परदेशी, जगदीश सूर्यवंशी आदींच्या पथकाने केली.