Ganpati Bappa’s artwork from Bhokari School goes viral on social media जळगाव (4 सप्टेंबर 2025) : जळगाव तालुक्यातील भोकर येथील रा.न.लाठी माध्यमिक व हि.ढो.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात गणपती विसर्जनाच्या वेळी गणेशाची कलाकृती सादर करण्यात आली. या सादरीकरणांमध्ये लाठी विद्यालयातील इयत्ता सहावी-बारावीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. उत्कृष्ट अशी कलाकृती सादर केली.

या सुंदर कलाकृतीला सध्या सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळत आहे. या कलाकृतीला दोन दिवसात तब्बल वन मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या सादरीकरणासाठी अनिल अंभोरे, विनोद सोनवणे, एम.डी.सोनवणे, अमोल पाटील, राहुल राजपूत, अपूर्वा पाटील, राखी सुरळकर यांनी परिश्रम घेतले.
या कलाकृती सादरी करण्याचे संस्थेचे चेअरमन, सचिव व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य यु.ी.चिंचाळे व पर्यवेक्षक एस.जे.न्हाळदे यांनी कौतुक केले.