Three gang rape minor girl in Chalisgaon taluka चाळीसगाव (4 सप्टेंबर 2025) : चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीनावर शेतात तिघा नराधमांनी अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी अत्याचाराचा व्हिडिओ काढत तो व्हायरलची धमकी देत पीडीतेचे शोषणही केले व अत्याचारातून अल्पवयीन गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

तिघांनी केला अत्याचार
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय पीडीता आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. संशयीत आरोपी नवनाथ दादाभाऊ सोनवणे, आरोपी दीपक नाना मोरे व पवन रावसाहेब मोरे यांनी देखील अल्पवयीन पिडिता घरी एकटी असताना आळीपाळीने अत्याचार करत व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला. या अत्याचारातून पीडीता तीन महिन्याची गरोदर राहिली.
चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील करीत आहेत.