चोरीच्या दुचाकीसह अट्टल चोरटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

A bike thief from Kusumbaya is caught by the Jalgaon Zilla Peth police. जळगाव (4 सप्टेंबर 2025) : जळगव जिल्हा पेठ पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणी कुसूंब्यातील चोरट्याला अटक केली आहे. विनेश चंपालाल बरडे (30, कुसूंबा, ता.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी जळगाव शहरातील डी मार्ट परिसरात आल्याची माहिती मिळताच त्यास चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.

जळगावातून लांबवली होती दुचाकी
जळगावातील डी.मार्ट परिसरात दुचाकी चोरटा विनेश बरडे आल्याची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना कळताच पोलिसांनी त्यास अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान त्याच्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पेठ पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश महाजन, नरेश सोनवणे, शरीफ शेख, तेजस मराठे, अमितकुमार मराठे, प्रशांत सैदाणे, विकास पहुरकर, प्रशांत लाड आदींच्या पथकाने केली.