Married woman from Morphal dies after falling into well while drawing water पारोळा (6 सप्टेंबर 2025) : विहिरीतून पाणी काढतांना पाय घसरल्याने विहिरीत पडून विवाहितेचा मृत्यू झाला. ही पारोळा तालुक्यातील मोरफळीत बुधवार, 3 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ज्योती ज्ञानेश्वर देवरे (माळी, 35) असे मृताचे नाव आहे.

काय घडले विवाहितेसोबत ?
ज्योती देवरे या मोरफळी शिवारातील शेतातील विहिरीवरून पाणी काढत असताना त्यांचा पाय घसरला व त्या पाण्यात पडला. ही घटना कळताच त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. बेशुद्धावस्थेत पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉ.गणेश पोले यांनी त्यांना तपासुन मयत घोषित केले. पारोळा पोलिसात ज्ञानेश्वर भिका देवरे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.