आमदारांचा गंभीर आरोप अन् एलसीबीचे तत्कालीन निरीक्षक संदीप पाटील निलंबित

The then police inspector of Jalgaon Crime Branch, Sandeep Patil, was finally suspended. जळगाव (6 सप्टेंबर 2025) : जळगाव गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना नाशिक आयजींनी अखेर निलंबित केले आहे. चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी डीपीडीसीच्या बैठकीत गंभीर आरोप करीत कारवाईची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली होती. या प्रकरणा अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे अहवाल सादर केल्यानंतर शुक्रवारी पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.

गंभीर आरोपाची प्रशासनाकडून दखल
जळगाव गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी नियोजन समितीच्या बैठकीत एका प्रकरणात गंभीर आरोप केले होते. चव्हाण यांच्या आरोप व तक्रारीनंतर वरिष्ठ पोलि अधिकार्‍यांनी चौकशी करीत अहवाल नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे सादर केला व शुक्रवारी पाटील यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.

निरीक्षक पाटील हे वैद्यकीय रजेवर गेल्याचे समजते. या आदेशामुळे जळगाव जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.