‘These’ accused arrested in Govind Komkar murder case पुणे (8 सप्टेंबर 2025) : पुण्यात टोळी युत्रद्धातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष कोमकर याचा शुक्रवारी सायंकाळी खून झाला. याप्रकरणी यश पाटील व अमित पाटोळे यानां अटक करण्यात आली.

यांच्याविरोधात गुन्हा
माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष याचा शुक्रवारी सायंकाळी नाना पेठेत बेछूट गोळीबार करून खून करण्यात आला. या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडूअण्णा आंदेकर याच्यासह त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर,नातू स्वराज वाडेकर,तुषार वाडेकर,अभिषेक आंंदेकर,शिवराज आंदेकर,वृंदावनी वाडेकर,लक्ष्मी आंदेकर,अमन युसुफ पठाण उर्फ खान आणि यश सिद्धेश्वर पाटील या 11 जणांविरुद्ध कल्याणी गणेश कोमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समर्थ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींना आता परिणाम भोगावेच लागणार : अमितेषकुमार
पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, या प्रकरणामधील काही आरोपीना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये जे कोणी सहभागी असतील, त्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतील तसेच उर्वरित आरोपींना येत्या कालावधीत अटक केली जाईल, असेही म्हणाले.