टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया, दो ये मटका गाणं वाजवत पुण्यात मयत वनराज आंदेकरांच्या भाच्याची हत्या

Gang war breaks out in Pune : Andekar’s nephew killed while the song Tapka Re Tapka is playing पुणे (6 सप्टेंबर 2025) : राज्यात गणेशोत्सव विसर्जनाची धूम सुरू असतानाच विद्येच्या माहेरघरात पूर्वसंध्येला माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या भाच्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे ही हत्या होत असतानाच शेजारीच टपका रे टपका गाण वाजवलं जात असल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे.

तीन गोळ्या झाडताच तरुण ठार
आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परत येत असताना, त्याच्या घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये दोघा अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछुट गोळीबार केला. हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यातील तीन गोळ्या आयुषला लागल्या. गंभीर जखमी झालेल्या आयुषला ससून रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

डीजेवर गाणं लावत हत्या
आयुष कोमकरची हत्या होत असताना बाजुच्या एका गणेश मंडळाच्या डीजेवर ’टपका रे टपका, एक ओर टपका’ हे गाणं लावण्यात आलं होतं. टपका रे टपका एक और टपका, तीन मे से एक गया, दो ये मटका हे गाणे डीजेवर लावत नाना पेठेत गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ गोविंद याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याबाबतचे वृत्त नवराष्ट्र या वृत्तसंस्थेने दिल्याचा हवाला दिल्याचे ‘एबीने माझा’ने दिले आहे

’टपका रे टपका, एक पहिला टपका, चार में से एक गया, तीन का ये मटका’, असे या गाण्याचे बोल आहेत. याबाबतची कसलीही पुष्टी पोलिसांनी केली नाही. मात्र याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे. त्यामुळे येत्या काळात पुण्यात आंदेकर विरुद्ध कोमकर असं टोळीयुद्ध पुन्हा भडकू शकतं.