Elderly man attacked in Kandari over goat dispute जळगाव (8 सप्टेंबर 2025) : शेतात बकरी शिरल्याच्या कारणावरून 74 वर्षीय वृद्धावर त्रिकूटाने हल्ला चढवल्याने वृद्धाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना रविवार, 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जळगाव तालुक्यातील कंडारी गावात घडली.

असे आहे मारहाण प्रकरण
लक्ष्मण बुधव परदेशी (74) यांच्या शेतात गावातीलच काही लोकांच्या बकर्या शिरल्या. याच कारणावरून त्यांना गावातीलच लक्ष्मण रामदास परदेशी, बादल लक्ष्मण परदेशी आणि आकाश लक्ष्मण परदेशी यांनी रविवार, 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिवीगाळ करत मारहाण केली. यातील एकाने लक्ष्मण परदेशी यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर जखमी लक्ष्मण परदेशी यांनी नशिराबाद पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास रवींद्र तायडे करीत आहेत.