Balgandharva Theatre in Jalgaon in the midst of controversy: Action taken in mutton and liquor party case creates excitement जळगाव (8 सप्टेंबर 2025) : जळगाव शहरातील प्रसिद्ध बालगंधर्व खुले नाट्यगृहात रविवार, 7 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता काही तरुणांनी नाट्यगृहात मद्य आणि मांसाहाराची पार्टी केली व त्याबाबतचा व्हिडिओ समोर येताच जळगाव महापालिका आणि पोलिस प्रशासनाने कारवाई करीत दोघांना अटक केली तर चौघे पसार झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

असे आहे प्रकरण ?
जळगवच्या बालगंधर्व नाट्यगृहात मद्य आणि मांसाहार शिजवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याची तक्रार मिळताच महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले आणि बांधकाम अभियंता आर.टी.पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी पोलिसांनाही माहिती मिळाल्याने डायल 112 च्या पथकासह जिल्हापेठ पोलिस आले तर दोघांना ताब्यात घेतले तर चौघे पसार झाले.
उघड्या दरवाज्यातून प्रवेश
पोलिसांना संशय आहे की, बालगंधर्व नाट्यगृहाच्या मागील बाजूस असलेल्या मोकाट गुरांच्या कोंडवाड्याचा दरवाजा उघडा असल्यामुळे संशयीत आत शिरले. पोलिसांनी घटनास्थळी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि मांस शिजवण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी महापालिकेच्या बांधकाम विभागाने जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस ताब्यात घेतलेल्या दोघांची चौकशी करत असून पसार चौघांचा शोध घेत आहेत.