Accident on old highway in Jalgaon: Female professor injured जळगाव (9 सप्टेंबर 2025) : शहरात अपघातांची मालिका काय आहे. जुन्या महामार्गावर कांताई नेत्रालयजवळ एका भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिला प्राध्यापिका या गंभीर जखमी झाल्या. जळगाव तालुका पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. नीता महेंद्र पाटील (39, रा.रेणुका नगर, जळगाव) या जखमी प्राध्यापिकेचे नाव आहे.
भरधाव कारने उडवले
प्रा.निता पाटील या एसएमआयटी महाविद्यालयात प्राध्यापिका नोकरीस आहेत. जुन्या हायवेने शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी जुपिटर (एमएच 19 सीए 5519) ने त्या एसएमआयटी कॉलेजकडून घरी जात असताना कांताई नेत्रालय जवळ भरधाव वेगाने आलेल्या एका कारने क्रमांक (एमएच 19 सीझेड 6610) ने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत महिला प्रा.नीता पाटील या दुचाकीवरून खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला व दोन्ही पायाला जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या. अपघातामुळे दुचाकीचे नुकसान झाले.
जळगाव तालुका पोलिसात नोंद
रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी दिलेल्या जवाबानुसार जळगाव तालुका पोलीस स्टेशनला कार क्रमांक (एम.एच.19 सी.झेड.6610) वरील अज्ञात महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास जळगाव तालुका निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक विजय निकम करीत आहेत.
