अफूच्या बोंडांची वाहतूक : पारोळ्यात 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

Major action by Parola police : Opium worth Rs 13 lakh seized पारोळा (10 सप्टेंबर 2025) : पारोळा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे राजस्थानी ढाब्यावर कारवाई करीत एका ट्रकमधील तब्बल 13 लाखांची अफूची 165 किलो बोंडे जप्त केली. या प्रकरणी पारोळा पोलिसात पोलिस कर्मचारी शरद पाटील यांच्या फिर्यादीवरून शैतामराम मानाराम बिष्णोई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पारोळा पोलिसांना राजस्थानी ढाब्यावर आलेल्या एका ट्रकमध्ये अफू असल्याची माहिती मिळाली होती. सोमवार, 8 सप्टेंबरला रात्री 11.30 वाजता छापेमारी करीत एका संशयीत ट्रक (आर.जे.21 सी.जी.2111) झडती घेतल्यानंतर त्यातून 165 किलो अफूची बोंडे जप्त करण्यात आली. या अफूचे बाजारमूल्य 13 लाख रुपये आहे. या प्रकरणी शैतानराम मानाराम बिष्णोई याला अटक करण्यात आली तर आरोपीचे साथीदार अन्य वाहनात होते मात्र कारवाईची कुणकुण लागताच ते पसार झाले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक योगेश महाजन, पोलिस कर्मचारी महेश पाटील, संदीप सातपुते, शरद पाटील, सुनील हटकर, प्रवीण पाटील, नीलेश साळुंखे, अभिजित पाटील, प्रवीण पाटील, नीलेश साळुंखे, अभिजीत पाटील, आशिश गायकवाड, गिरीश सोनवणे आदींच्या पथकाने केली.