नर्तकीच्या घराबाहेर प्रियकर माजी उपसरपंचाची गोळी झाडत आत्महत्या

Married former sub-sarpanch, who was in love with a dancer, commits suicide by shooting himself बार्शी (10 सप्टेंबर 2025) : नर्तकीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराला भेटण्यास नकार दिलेल्या माजी सरपंचांनी गोळी झाडून कारमध्ये आत्महत्या केली. ही घटना सासूरे (ता. बार्शी) येथे घडली. गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) असे मृताचे नाव असून ते लुखामसला (ता.गेवराई) गावचे माजी उपसरपंच होते.

दरम्यान, नर्तकी पूजाने प्रेमसंबंध ठेवून वेळोवेळी पैसे व सोने लुबाडले मात्र तरीदेखील तिची हाव कमी झाली नाही. भावाच्या नावावर पाच एकर शेती करावी अथवा गेवराईतील नवीन घर नावावर करण्यासाठी तिने तगादा लावला होता अन्यथा दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिल्यानेच बर्गे यांनी आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

प्रेयसीच्या घरासमोर संपवले जीवन
बर्गे हे प्रेयसीला भेटायला येऊनही तिने कॉल उचलला नाही त्यामुळे कारमध्ये त्यांनी गोळी मारून आत्महत्या केली. मृत गोविंद यांच्या मेहुण्याच्या फिर्यादीवरून संशयित नर्तकी पूजा देविदास गायकवाड (21, सासुरे, ता.बार्शी) विरुद्ध वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

मैत्रीचे झाले प्रेमात रुपांतर
घटनेची माहिती मिळताच मंगळवार, 9 रोजी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, वैराग पोलिसही घटनास्थळी आले. सायंकाळच्या सुमारास गोविंद यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

लुखामसला गावचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे हा कला केंद्रात नेहमी येत होता. सुमारे एक- दीड वर्षापूर्वी कला केंद्रामध्ये सासुरे (ता. बार्शी) परिसरातील नर्तकी पूजा देविदास गायकवाड सोबत गोविंदची ओळख झाली. तेथून ती पारगाव कला केंद्राकडे जाऊ लागली आणि गोविंदची मैत्री वाढली व त्यांच्यात प्रेम झाले. यातून अनेकदा त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे बर्गे यांच्या नातेवाइकांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्या तरुणीने गोविंद याच्यासोबतचा संपर्क तोडला होता, त्यामुळे तो नैराश्यात होता. त्या नैराश्यातूनच गोविंद सोमवार, 8 रोजी मध्यरात्री गेवराईवरून सासुरे गावी आला होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडल्याचेही त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, बार्शी विभागाचे पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर, वैराग ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित जगदाळे यांनी भेट दिली.

पोलिस पाटलांनी दिली खबर
सासुरे येथील पोलिस पाटील शीतल करंडे यांनी गावातील एका व्यक्तीच्या घरासमोर थांबलेल्या चारचाकी कारमध्ये (एम.एच.23 बी.एस.5023) एकजण मृतावस्थेत असल्याची खबर वैराग पोलिसांना दिली. त्याच्याकडे एक पिस्टल दिसत होते. वैराग पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. ज्याच्या घरासमोर गाडी होती, त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान, मयत विवाहित असून त्याला पत्नी, नववीत शिकणारी मुलगी व सहावीत शिकणारा मुलगा आहे.