Uproar in Manikrao Kokate’s Sinnar taluka : 79 Gram Panchayat members disqualified at once नाशिक (9 सप्टेंबर 2025) : मुदत उलटूनही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे सिन्नर तालुक्यातील तब्बल 79 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईमुळे सिन्नरमधील अनेक गावांच्या कारभारावर गंभीर परिणाम होणार आहे.

क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर तालुक्यात या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने तालुक्यातील 79 ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील 10-1 अ नुसार या सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. आगामी स्थानिक निवडणुका आता तोंडावर आलेल्या असताना करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गावपातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र
मुसळगाव, सोनांबे, विंचूर दळवी, चंद्रपूर, धोंडबार, निमगाव देवपूर, सांगवी, धारणगाव, ब्राह्मणवाडे, मर्हळ खुर्द, देशवंडी, निहर्हाळे, चिंचोली, सोनारी, मेंढी, औंढेवाडी, आटकवडे, सावता माळीनगर, दत्तनगर, पांगरी बुद्रुक, कोनांबे, बेलू, चास, पिंपळे, बोरखिंड, आडवाडी, मलढोण, जामगाव, रामनगर, धोंडवीरनगर, दुशिंगपूर, वडझिरे, हिवरे, केपानगर, यशवंतनगर, वडगाव सिन्नर, नळवाडी, खंबाळे, पाथरे बुद्रुक, कुंदेवाडी, सोनगिरी, कणकोरी, चोंढी, पुतळेवाडी, शिवडे, आशापुरी, घोटेवाडी, फर्दापूर, दहीवाडी, दातली, पिंपळगाव, भरतपूर, दोडी खुर्द, कोमलवाडी बोरखिंड, पांढुर्ली, सरदवाडी, या गावातील ग्रामपंचायत सदस्य अपात्र घोषित करण्यात आले आहेत.