A gang of notorious criminals with two pistols and 10 cartridges was caught by Jalgaon city police जळगाव (12 सप्टेंबर 2025) : जळगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे मोठा गुन्हा करण्यासाठी बाहेर पडलेल्या गुन्हेगारांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून दोन पिस्टल व दहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (33, गेंदालाल मिल, जळगाव), निजामोद्दीन शेख हुसनोद्दीन शेख (31, आझाद नगर, जळगाव), शोएब अब्दुल सईद शेख (29, गेंदालाल मिल, जळगाव), सौहिल शेख उर्फ दया सीआयडी युसूफ शेख (29, शाहू नगर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गंभीर गुन्ह्यातील आरोपी मोठा गुन्हा करण्यासाठी शस्त्र घेवून कारद्वारे बाहेर पडल्याची माहिती जळगाव शहर पोलिस ठाण्यातील एएसआय सुनील पाटील, हवालदार सतीश पाटील, कॉन्स्टेबल अमोल ठाकूर व कॉन्स्टेबल प्रणय पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी गेंदालाल मिल परिसरातील सुरेशदादा जैन बंगल्यासमोरील रस्त्यावरून कार (एम.एच. 43 यु.आर.9678) मधून चौकडीला ताब्यात घेत त्यांच्याकडील दोन पिस्टल, दहा जिवंत काडतूस, एक धारदार मोठा चाकू मिळून एकूण एक लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त करीत त्यांच्याविरोधात जळगाव शहर प9ोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी युनूस विरोधात गंभीर गुन्हे
आरोपी युनूस उर्फ सद्दाम पटेलविरोधात जळगाव शहर पोलिसात तीन, भुसावळ रेल्वे पोलिसात व जळगाव तालुका पोलिसात प्रत्येकी एक गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे.