Nimbhora police’s big achievement : A gang of six people who stole agricultural equipment, along with agricultural equipment worth Rs 11 lakh, was seized. भुसावळ (14 सप्टेंबर 2025) : निंभोरा पोलिस ठाण्याचे डॅशिंग सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी शेती साहित्याची चोरी करणार्या सहा आरोपींना आतापर्यंत अटक केली असून त्यांच्याकडून 11 लाखांचे शेती साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, अटकेतील महिला आरोपीला 15 तर इतर चार पुरुष आरोपींना 16 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर अर्जुन सोळंकी नामक सहाव्या आरोपीला शनिवारी रात्री बेड्या ठोकण्यात आल्या.

या आरोपींना अटक
पोलिसांनी गुरुवारी वडगाव शिवारातील झोपडीतून चोरीला गेलेले शेती साहित्य जप्त केले तर योगीता सुनील कोळी (रा. वडगाव) या महिलेस अटक केल्यानंतर जमील अब्दुल तडवी (रा.वडगाव ता.रावेर), स्वप्नील वासुदेव चौधरी (रा.निंभोरा), आकाश मधुकर गोंधळी, गोपाल संजय भोलणकर (रा.शिरसाळा ता. बोदवड) या चौघांची नावे समोर येताच त्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींना रावेर न्यायालयाने 16 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
11 लाखांचा मुद्देमाल
पोलिस पथकाने आरोपींना सोबत घेत रावेर, बोदवड, भुसाव तालुक्यात निंभोरा, खिर्डी, न्हावी, चिनावल, करणगाव, शिरसाळा आदी ठिकाणावरून चोरी केलेली मुद्देमाल पुन्हा हस्तगत केला. आतापर्यंत जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 11 लाखांवर आहे. विलास उर्फ कालू सुपडू वाघोदे (रा.वडगाव) मुख्य संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती निंभोरा एपीआय हरिदास बोचरे यांनी दिली. चोरट्यांकडून चोरीचे साहित्य खरेदी करणारेही रडारवर असल्याचे ते म्हणाले.