भुसावळा पालिका निवडणूक : केवळ एक हरकत मान्य, 30 हरकती नामंजूर

Bhusawal Municipality Election : 30 objections rejected भुसावळ (15 सप्टेंबर 2025) : भुसावळ पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग प्रसिध्द होऊन यावर 31 हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. यातील 30 हरकती नामंजूर करण्यात आल्या आहेत. केवळ माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे यांनी प्रभाग क्रमांक 22 मधून प्रगणक गट 259 वगळून तो प्रभाग 21 मध्ये समाविष्ठ करण्याची मागणी मान्य करुन याबाबत शिफारस करण्यात आली आहे.

30 हरकती नामंजूर
पालिका प्रशासनाने प्रारुप प्रभाग रचना जाहिर केली. यानंतर अखेरच्या मुदतीपर्यंत 31 हरकती दाखल झाल्या होत्या. यात नैसर्गिक सिमांचे उल्लंघन, प्रभागांचे विभाजन, लोकसंख्येत असमानता आदी विषयांवर अधिक हरकती होत्या. यातील माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे यांनी प्रगणक गट 259 हा प्रभाग 22 मधून वगळून प्रभाग 21 मध्ये सामिल करावा, अशी हरकत घेतली होती. प्रभाग 21 ची लोकसंख्या 7 हजार 24 तर प्रभाग 22 ची लोकसंख्या 8 हजार 204 इतकी होती. यामुळे हा प्रगणक गट प्रभाग 22 मधून काढून तो प्रभाग 21 मध्ये जोडल्यास दोन्ही प्रभागांतीनल लोकसंख्येचा समतोल साधला जाईल, अशी शिफारस करण्यात आली आहे. उर्वरित 30 हरकती नामंजूर करण्यात आल्या आहेत.

अर्जदाराला कळविण्याची गरज नाही
शासकी नियमावलीनुसार नामंजूर झालेल्या हरकतींची निर्णय अर्जदारास कळविण्याची आवश्यकता नाही, यामुळे नामंजूर हरकतींची माहिती संबधीत अर्जदारांना प्रशासनाने कळवलेली नाही. 26 ते 30 सप्टेंबरच्या काळात राज्य निवडणूक आयोगाकडून अंतीम प्रभाग रचना अधिसूचनेव्दारे प्रसिध्द केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.