भुसावळात विद्यार्थ्यांना मशिदीत नेत ब्रेन वॉश : दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी उद्या सेंट अलॉयसीस स्कूलवर मोर्चा

Students taken to mosque in the name of a trip : March on St. Aloysius School in Bhusawal on Tuesday भुसावळ (14 सप्टेंबर 2025) : शहरातील सेंट अलॉयसीस हायस्कूलने गुरुवार, 11 सप्टेंबर रोजी इयत्ता नववीच्या स्काऊट विद्यार्थ्यांची शहरात धार्मिक सहल काढली. या सहलीत मुस्लिम धर्मियांच्या मशिदीमध्ये महिलांना प्रवेश निषिध्द असतानाही मुलींना स्कार्प (हिजाब प्रमाणे पेहराव करुन) व मुलांना डोक्यावर रुमाल बांधून प्रवेश देण्यात आला. याबाबत संतप्त हिंदू बांधव व पालकांनी शनिवारी शाळेत जावून संताप व्यक्त करुन जाब विचारला. धार्मिक सलोख्याच्या नावाखाली हिंदू मुलांना इतर धर्मियांचे ब्रेनवॉश केले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. दरम्यान, या प्रकारानंतर शहरातील पालकांसह भारतीय जनता पार्टी व हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहते. मंगळवार, 16 रोजी सकाळी 10 वाजता शाळेवर मोर्चा काढत जाब विचारला जाणार आहे.

काय घडले भुसावळात ?
भुसावळ शहरातील हिंदूत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी सेंट अलॉयसीस शाळा गाठून प्रिन्सीपल सिस्टर शिला व संबंधीत शिक्षक अमोल दंदाले यांच्यासोबत चर्चा केली. सेंट अलॉयसीस शाळेतील स्काऊड गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी 11 सप्टेंबरला धार्मिक सलोखा सहल काढण्यात आली. यासाठी मुलांकडून 100 रुपये शुल्क घेण्यात आले. मुस्लिम धर्मियांमध्ये जर महिलांना मशिदीत प्रवेश नाही, तर मुलींना स्कार्प व हिजाबप्रमाणे पेहराव करुन का नेले? मशिदीत जाताना मुलांना डोक्यावर रुमाल बांधायला लावला, त्याप्रमाणे मंदिरात जाताना मुलांच्या कपाळावर तिलक का केला नाही? असा प्रश्न आरोपही यावेळी पालक व हिंदूत्ववादी संघटनांनी केला. या सहलीचे औचित्य काय? यातून मुलांचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी शाम दरगड, भारती वैष्णव, शिवसेनेच दीपक धांडे, भाजपचे शिशिर जावळे आदींसह अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्याध्यापिकेने पाळले मौन
संबंधीत शिक्षकाने आधी या प्रकारावर त्यांचे काहीच चुकले नाही. मुली मशिदीत नमाजसाठी जावू शकत नाही मात्र वास्तूकलेची माहिती घेण्यासाठी जावू शकतात, असा मुद्दा मांडला मात्र हिंदूत्ववादी संघटनांनी याबाबत अनेक प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर संबंधीत शिक्षकाने माफी मागितली मात्र बैठकीत सेंट लायन्सेस शाळेच्या मुख्याध्यापिका एक चकार शब्दही बोलल्या नाहीत.

हिंदूत्ववादी संघटना संतप्त : मंगळवारी शाळेवर मोर्चा
शहरातील हिंदूत्ववादी संघटनांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी सकाळी सकल हिंदू समाजातर्फे गटशिक्षणाधिकारी व प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येईल तर भाजपातर्फे शाळेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. संबंधीत शाळेच्या प्रशासनावर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.