Birthday wishes showered on MLA Chandrakant Patil मुक्ताईनगर (15 सप्टेंबर 2025) : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आक्रमक व जनतेच्या हक्कासाठी सदैव लढणारे आमदार चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.

आमदार पाटील हे आपल्या कार्यकाळात सदैव सामान्य माणसाच्या प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवणारे, विकासकामांना वेग देणारे व मतदारसंघाच्या हितासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ते जिल्ह्यापासून राज्यापर्यंत चर्चेचा विषय राहिले आहेत.
जनतेचा विश्वास
आमदार साहेब हे आमच्या मतदारसंघाचे खरे रक्षक आहेत. विकासकामांबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा
वाढदिवसानिमित्त विविध गावांमध्ये रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, क्रीडा स्पर्धा व गरजूंना मदतकार्य असे उपक्रम हाती घेण्यात आले. कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून आमदारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला.