आदर्श नगरातून 45 हजारांच्या बॅटरी लांबवल्या

Batteries stolen from mobile tower in Jalgaon जळगाव (16) : जळगाव शहरातील आदर्श नगरातील टॉवरमधून चोरट्यांनी 45 हजार रुपये किंमतीच्या 24 बॅटरी लांबवल्या. चोरीचा प्रकार 20 ऑगस्ट रोजी तपासणीसाठी गेलेल्या सुपरवायझरच्या लक्षात आली. याप्रकरणी सोमवार, 15 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले जळगावात ?
जळगाव शहरातील शहरातील आदर्श नगरातील रुस्तमजी शाळेजवळ टॉवर बसविण्यात आले आहे. 20 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास इंडस टॉवरचे सुपरवायझर विकास चंद्रकांर हे टॉवर व्यवस्थित काम करत नसल्याने हे पाहण्यासाठी तेथे गेले होते. यावेळी त्यांना टॉवरमध्ये बसविलेल्या 24 बॅटर्‍या अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी तपास केल्यानंतर सोमवारी दुपारी तीन वाजता अमोल चरणदास शेंद्र यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंद पोलिसात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक हेमंत कळसकर करीत आहे.