Angry son-in-law sets fire to schoolboy’s hotel after wife doesn’t return home केज (17 सप्टेंबर 2025) : ‘बायकोला नांदायला का पाठवीत नाही?’ या रागातून एका जावयाने आपल्या मेहुण्याचे (शालकाचे) हॉटेल पेटवले. ही धक्कादायक घटना केज तालुक्यातील टाकळी शिवारात घडली. या आगीत हॉटेलमधील सुमारे 70 ते 80 हजार रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.

नानाभाऊ कदम यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी सोनीजवळा येथील तानाजी रामदास गायकवाड यांच्यासोबत झाला होता. त्यांना तीन मुले आहेत. पती तानाजी हा ज्ञानेश्वरीला नेहमीच मारहाण करत असल्यामुळे ती आपल्या मुलांसह माहेरी, कदमवाडी येथे भाऊ आसाराम कदम यांच्याकडे राहण्यासाठी आली होती.
दोन आठवड्यांपूर्वी तानाजी गायकवाड कदमवाडी येथे आला होता. त्यावेळी त्याने ‘माझ्या बायकोला नांदायला पाठवले नाही, तर मेहुणा आसाराम कदम याला जिवे मारून टाकीन’ अशी धमकी दिली होती.
रर्वींशीींळीशाशपीं
या धमकीनंतर रविवारी रात्री तानाजीने मेव्हणा आसाराम कदम यांच्या अहमदनगर-अहिल्यानगर महामार्गावरील हॉटेलला आग लावली. या आगीत हॉटेलचे पत्र्याचे शेड, डीप फ्रीज, फ्रीज, काउंटर, खुर्च्या, टेबल, पाण्याचे जार आणि इतर सर्व साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी आसाराम कदम यांच्या फिर्यादीवरून तानाजी गायकवाड याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.