भुसावळ रेल्वे स्थानकावर कोर्ट कॅम्प : 1.98 लाखांचा दंड वसुल

भुसावळ आरपीएफ, वाणिज्य विभागाची संयुक्त मोहीम

Special Camp Court at Bhusawal Junction : 352 cases disposed of Total fine of Rs 1.98 lakh recovered भुसावळ (17 सप्टेंबर 2025)  भुसावळ रेल्वे स्टेशनवर मंगळवारी लोहमार्ग न्यायालयाच्या देखरेखीखाली स्पेशल कॅम्प कोर्ट आयोजित करण्यात आला. या मोहिमेत रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) व वाणिज्य विभागाने संयुक्त कारवाई केली. या अभियानादरम्यान पॅन्ट्रीकार, महिला कोच, दिव्यांगजन कोच तसेच स्टेशन परिसरातील अतिक्रमण, अवैध धूम्रपान, ट्रेसपास, हॉकर्स आणि वेंडर्सवर कारवाई करण्यात आली.

प्रलंबित प्रकरणांचाही निपटारा
वाणिज्य विभागाने 83 प्रकरणांतून 53 हजार 250 रूपये इतकी दंड रक्कम वसूल केली. त्याचबरोबर रेल्वे अधिनियमाच्या विविध कलमान्वये 159 प्रकरणे नोंदवली गेली. स्पेशल कॅम्प कोर्टात प्रलंबित प्रकरणांचाही निपटारा करण्यात आला.

त्यामध्ये भुसावळ स्टेशनचे प्रलंबित केसेस 94, पेंडिंग ट्रायल केसेस 55, आरपीएफ भुसावळ यार्डचे केस 44, या सर्व प्रकरणांचा मिळून एकूण 352 प्रकरणांचा निपटारा झाला.न्यायालयाने यामध्ये 1 लाख 34 हजार 770 इतका दंड ठोठावला. त्याशिवाय वाणिज्य विभागाच्या कारवाईतून 53 हजार 250 रूपये तर पॅन्ट्रीकारवरील कारवाईतून 10 हजार रूपये वसूल करण्यात आले.

एकूण स्पेशल कॅम्प कोर्टाच्या या मोहिमेतून एक लाख 98 हजार 20 रुपये इतकी रक्कम दंड स्वरूप वसूल झाली. रेल्वे प्रशासनाने सांगितले की, अशा प्रकारचे अभियान पुढेही नियमित राबवले जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसोबतच रेल्वे परिसर अवैध कृत्यांपासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न सुरू राहील. असे निरीक्षक पी.आर.मीना यांनी सांगितले.