पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावात रंगली चित्रकला स्पर्धा

Painting competition held in Chalisgaon on the occasion of Prime Minister Narendra Modi’s birthday चाळीसगाव (17 सप्टेंबर 2025)  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आ.ब. मुलांच्या हायस्कुलमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मुक्तपणे रंगांची व विचार कल्पकतेची उधळणी केली.

चित्रकलेसाठी आत्मनिर्भर भारत, पर्यावरण संवर्धन, आजची आवश्यकता, ऑपरेशन सिंधूर, डिजिटल इंडिया, भारतीय संस्कृती व सण, स्वच्छ भारत, सुंदर भारत, स्वदेशी वस्तूंचा वापर या विषयांवर सदरील चित्रकला स्पर्धा झाली.

यावेळी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विलास भोई, विरेंद्र पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी कलेतील बारकावे देखील समजावून सांगितले. यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका एस.पी.पाटील, पर्यवेक्षक प्रशांत नेरकर, पर्यवेक्षिका सुनीता कासार तसेच कलाशिक्षक चेतन कुर्‍हाडे व चित्रकार दिनेश चव्हाण यांचे विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.