मध्यप्रदेशातील दुचाकी चोरटा तीन दुचाकींसह जाळ्यात : भुसावळातून चोरल्या दोन दुचाकी

Big action by Bhusawal market police : Thief from Madhya Pradesh caught with three stolen two-wheelers भुसावळ (17 सप्टेंबर 2025) : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मध्यप्रदेशातील दुचाकी चोरट्याला बेड्या ठोकल्या असून त्याच्याकडून दोन लाख 25 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या बुलेटसह तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीचा एक अल्पवयीन साथीदारही ताब्यात घेण्यात आला आहे. अर्षद खान अहमद खान (22, रा.खाजा नगर, आझादनगर, बर्‍हाणपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळातील सुनील पांडुरंग इंगळे (पांडुरंगनाथ नगर, भुसावळ) यांची महागडी बुलेट चोरी झाल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता व या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी बर्‍हाणपूरचा असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपीने चोरीची बुलेट (एम.एच.19 ईडी 7650) काढून दिली तसेच बाजारपेठ हद्दीतून चोरलेली एक प्लॅटीना दुचाकी (एम.एच.19 डी.एस.3722) तसेच विना क्रमांकाची बजाज सीटी 100 दुचाकी काढून दिली आहे. या दुचाकीची चेचीस क्रमांकाद्वारे ओळख पटवली जात आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, हवालदार कांतीलाल केदारे, हवालदार किरण धनगर, हवालदार रवींद्र भावसार, चालक सहा.फौजदार सुनील सोनवणे, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल हर्षल महाजन, जीवन  कापडे, कॉन्स्टेबल महेंद्र पाटील, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, कॉन्स्टेबल अमर अढाळे, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास हवालदर विजय नेरकर करीत आहेत.