बिलवाडी हत्याकांड प्रकरणात तीन आरोपींना अटक

Bilwadi murder case in Jalgaon taluka : Three accused arrested जळगाव (17 सप्टेंबर 2025) : जुन्या वादातून झालेल्या तुंबळ हाणामारीत बिलवाडी, ता.जळगाव येथे एकनाथ निंबा गोपाळ (55) यांचा मृत्यू होवून 11 जण जखमी झाले होते. याप्रकरणातील आरोपींवर अटकेची कारवाई होण्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली. आरोपींना जळगाव न्यायालयाने 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

जुन्या वादातून तुंबळ हाणामारी
जळगाव तालुक्यातील बिलवाडी गावातील गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या 10 वर्षांपासून जुना वाद सुरू आहे. या वादातून हे हत्याकांड घडले होते. यात सुरुवातीला 7 व नंतर 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेत प्रमुख संशयित रोहिदास पाटील हा सूत्रधार असल्याचा आरोप गोपाळ कुटुंबीयांचा आहे. त्यासाठी त्यांनी सोमवारी आकाशवाणी चौकात चक्का जाम करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे घोषणाबाजी करून नंतर जिल्हाधिकारी व पुढे एसपी कार्यालयात जाऊन पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. खून प्रकरणातील पसार असलेल्या रोहिदास काशीनाथ पाटील (50), कल्पेश बाळासाहेब पाटील (23), संगीताबाई रोहिदास पाटील (40) यांना बुधवार, 17 रोजी अटक करण्यात आली आहे. संशयीतांना न्या. एस.व्ही.मोरे यांच्या न्यायासनात हजर केले असता त्यांना 22 पर्यंत सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.