Terrible accident near Malkapur : Four people from Bhusawal killed मलकापूर (18 सप्टेंबर 2025) : भरधाव इको कार ट्रेलरवर आदळून झाालेल्या भीषण अपघातात भुसावळातील चालकासह अन्य चौघांचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात मलकापूरजवळील राष्ट्रीय महामार्गांवर रणथमजवळ बुधवर, 17 रोजी मध्यरात्रीनंतर घडला. साजीद अजीज बागवान (30, भुसावळ) असे मृत चालकाचे नाव असून त्याची पत्नीदेखील अपघातात ठार झाली असून अन्य तिघांचाही मृत्यू ओढवला आहे.

सुसाट कार ट्रेलरवर आदळली : पाच जणांचा मृत्यू
कार चालक साजीद अजीज बागवान हा काही प्रवाशांसह मारूती ईको कारने (क्र.एम.एच.46 एक्स.3120) ने मलकापूरकडे निघाल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार भरधाव वेगात समोर असलेल्या मोठ्या ट्रेलरला पाठीमागून धडकली. या अपघातात या अपघातात कारचा चालक साजीद अजीज बागवान (30, रा.भुसावळ), त्याची पत्नी तानी साजीद बागवान (25), जुमा शिकलकर (49) यांच्यासह एका 35 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला तर संतोष तेजराव महाले (40, रा.चिखली, ता.मुक्ताईनगर) यांचा जळगावात गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातात पंकज दिलीप गोपाळ (22, रा.नांद्रा हवेली, जि.जळगाव), दीपिका विश्वास (30, रा.पश्चिम बंगाल), टीना अजय पाटील (45, रा.भुसावळ) यांच्यासह एक अनोळखी महिला असे चौघे गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मयत चालकाविरोधात गुन्हा
या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी मलकापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी एपीआय हेमराज कोळी व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघात प्रकरणी अक्षय भास्कर सोनवणे (22, रा. चिखली) यांच्या तक्रारीवरून मयत ईको कार चालक साजीद बागवान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे साजीदचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी जात असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. तपास ठाणेदार हेमराज कोळी ठाणेदार करीत आहे.