‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरीत जळगावच्या गुरुवर्य प.वि. प्राथमिक विद्यालयाचा डंका

बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम : एकल सादरीकरणात वैभवी बगाडेला विशेष लक्षवेधी

Guruvarya P.V. Primary School, Jalgaon, wins in the grand finale of ‘History of Maharashtra’  जळगाव (18 सप्टेंबर 2025) : बालरंगभूमी परिषदेतर्फे संपूर्ण राज्यभरात अध्यक्ष अ‍ॅड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून ‘इतिहास महाराष्ट्राचा – श्री शिवजन्मोत्सव ते श्री शिवराज्याभिषेक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरात 26 ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेरीतील सात हजाराहून अधिक बालकलावंतांमधून निवडलेल्या सर्वोत्कृष्ठ व उत्कृष्ठ विजेत्यांची महाअंतिम फेरी दि. 13 व 14 सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल मुंबई येथे पार पडली. या महाअंतिम फेरीत समूह गटात शहरातील गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालयाने विशेष लक्षवेधी पुरस्कार तर वैभवी बगाडे हिने विशेष लक्षवेधी पुरस्कार पटकावत या स्पर्धेत आपला डंका गाजवला आहे.

समूह गटात गुरुवर्य परशुराम विठोबा प्राथमिक विद्यालयाने साभिनय सादर केलेल्या पोवाड्याला हा विशेष लक्षवेधी पुरस्कार तसेच वैभवी बगाडे या विद्यार्थिंनींने सादर केलेल्या पोवाड्याला विशेष लक्षवेधी पुरस्कार प्राप्त झाला आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुप्रसिध्द लोकशाहीर नंदेश उमप, सिने नाट्य अभिनेते सुनिल गोडसे व सुप्रसिध्द शिवशाहीर प्रवीण जाधव हे होते.

बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अ‍ॅड.निलम शिर्के सामंत, कार्याध्यक्ष राजू तुलालवार, उपाध्यक्ष ड.शैलेश गोजमगुंडे, डॉ.दीपा क्षीरसागर, प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल, कोषाध्यक्ष नंदकिशोर जुवेकर, सहकार्यवाह दीपाली शेळके, आसीफ अन्सारी, कार्यकारिणी सदस्य त्र्यंबक वडसकर, नागसेन पेंढारकर, वैदेही चवरे सोईतकर, अनंत जोशी, सीमा यलगुलवार, सुजय भालेराव, शिवाजी शिंदे, वैभव जोशी आदींच्या हस्ते प.वि.विद्यालयाच्या संघास पारितोषिक प्रदान करण्यात आले.

जळगावच्या बालकलावंतांनी मिळविलेल्या घवघवीत यशाबद्दल बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखा अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, उपाध्यक्ष अमोल ठाकूर, कोषाध्यक्ष सचिन महाजन, सदस्य दर्शन गुजराथी, नेहा पवार, सुदर्शन पाटील, दीपक महाजन, पंकज बारी, हर्षल पवार, मोहित पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.