Married woman in Shirsoli, five months pregnant, commits suicide जळगाव (18 सप्टेंबर 2025) : माहेरी आलेल्या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे ही विवाहिता पाच महिन्यांची गरोदर असल्याची माहिती आहे. ही घटना गुरुवार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता शिरसोली येथे घडली. एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रतीक्षा चेतन शेळके (22, रा.शिरसोली प्र.न., ता.जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

वर्षभरापूर्वीच विवाह : आत्महत्येचे कारण अस्पष्ट
प्रतीक्षा शेळके यांचा वर्षभरापूर्वी पुण्यातील चेतन शेळके यांच्याशी लग्न झाले. विवाह संबंधातून प्रतीक्षा पाच महिन्यांची गरोदर होती. विवाहिता गरोदर असल्याने प्रतीक्षा शिरसोली येथे माहेरी वडिल भागवत धामणे यांच्याकडे आली होती. माहेरी आई, वडील, लहान भाऊ, आजी असा परिवार आहे. गुरुवारी दुपारी प्रतीक्षा ही घरी एकटीच असताना तिने छताला गळफास लावला. तिची आजी दुपारी घरी आली तेव्हा तिला प्रतीक्षाचा मृतदेह दिसला. यावेळी तिने एकच हंबरडा फोडला.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आजीचा आवाज ऐकून शेजारील ग्रामस्थ धावत आले. त्यांनी प्रतीक्षाच्या कुटुंबाला माहिती दिली. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी घटनास्थळी येऊन एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.
प्रतीक्षाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल केला असता तेथे तपासून तिला मयत घोषित करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. दरम्यान, प्रतिक्षाने आत्महत्या का केली? याबाबत कारण अस्पष्ट आहे. एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.